मोदींच्या वादळात उद्धवजी उडून जातील

  148

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका


नागपूर : मोदी नावाचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी पाला-पाचोळ्यासारखे उडून जातील, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल उद्धव ठाकरेंची सभा पाचोरा येथे पार पडली. त्यानंतर बावनकुळेंनी हा घणाघात केला आहे.


बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही टीका केली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्यानंतर टीका टिप्पण्या सुरू झाल्या आहेत.


उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, "मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशाने पसंती दिली आहे. मोदीजींच्या वादळात उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली पण ते त्यात अपयशी ठरले. खोटं बोल पण रेटून बोल, अशी त्यांची अवस्था झाली आहे."


बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. "संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करताय, मोदी नावाचे वादळ येणार आहे. संजय राऊत सवयीप्रमाणे बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणे नाही. पाठीत खंजीर खुपसणे त्यांच्या रक्तात आहे", असेही बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला