Wednesday, April 30, 2025

मनोरंजनकोलाजसाप्ताहिक

‘केबीसी १५’मध्ये सहभाग घेण्यास व्हा सज्ज

‘केबीसी १५’मध्ये सहभाग घेण्यास व्हा सज्ज
  • ऐकलंत का!: दीपक परब

‘कौन बनेगा करोडपती-१५’ चा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनबाबत माहिती देताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती-१४’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीझनच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती-१५’चा मजेशीर प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनबाबत माहिती देताना दिसत आहेत.

सोनी चॅनलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कौन बनेगा करोडपती-१५ चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, एक मुलगी आपल्या घराच्या बाहेर एक भुयारी मार्ग तयार करते. या भुयारी मार्गातून ती थेट केबीसीच्या स्टेजवर पोहोचते. अमिताभ बच्चन यांना स्टेजवर पाहून ती खूश होते. त्यानंतर त्या मुलीला ‘बिग बी’ हे केबीसीच्या हॉट सीटपर्यंत कसे पोहोचायचे? याबाबत माहिती देतात. ‘२९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता फक्त फोन उचला आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठवा’, असे बिग बी म्हणतात. कौन बनेगा करोडपती-१५ च्या या प्रोमोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment