मुंबईच्या विजयी घोडदौडला ब्रेक

पंजाबचा इंडियन्सवर १३ धावांनी विजय


मुंबई (प्रतिनिधी) : सॅम करनची फटकेबाजी आणि अर्शदीप सिंगच्या विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजीने पंजाब किंग्सला शनिवारी विजय मिळवून दिला. घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यातील पराभवामुळे मुंबईच्या विजयी घोडदौडला ब्रेक लागला. कॅमेरॉन ग्रीन आणि सूर गवसलेला सूर्यकुमार यादव यांची तुफानी अर्धशतके व्यर्थ गेली.


पंजाबने दिलेल्या २१५ या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने निराश केले. अवघी एक धाव करून किशन माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरॉन ग्रीनने फलंदाजीची सूत्रे हाती घेत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. ४४ धावा करत रोहितने ग्रीनची साथ सोडली. सूर्यकुमार यादवला या सामन्यात सूर गवसला. त्याने ग्रीनच्या साथीने अप्रतिम फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. परंतु सामन्याचा शेवट करणे त्याला जमले नाही. ग्रीनने ४३ चेंडूंत ६७, तर सूर्याने २६ चेंडूंत ५७ धावा जोडल्या. सूर्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर ग्रीनने ६ चौकार आणि ३ षटकार फटकवले. ही जोडगोळी बाद झाल्यावर टिम डेव्हीड मुंबईच्या विजयासाठी प्रयत्नशील होता. परंतु त्याला जमले नाही. अखेर २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात मुंबईची मजल २०१ धावांपर्यंतच पोहचू शकली. पंजाबच्या विजयाचा शिल्पकार अर्शदीप सिंग ठरला. त्याने ४ षटकांत २९ धावा देत ४ फलंदाजांना माघारी पाठवले.


पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात २१४ धावा केल्या. कर्णधार सॅम करनच्या वादळी अर्धशतकच्या जोरावर पंजाबने २०० धावांचा पल्ला ओलांडला. सॅम करनने ५५ धावांची वादळी खेळी केली. तर हरप्रीत सिंह भाटियाने जबदरस्त ४१ धावांचे योगदान दिले.


पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि मॅथ्यू शॉर्ट सलामीला उतरले होते. पण शॉर्ट लवकरच तंबूत परतला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी फक्त १८ धावांची भागिदारी केली. कॅमरुन ग्रीन याने शॉर्ट याला ११ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मराठमोळ्या तायडेने प्रभसिमरनसोबत धावांचा पाऊस पाडला. पंजाबने सहा षटकांत ५८ धावा केल्या. पण त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरनला २६ धावांवर बाद केले. ६५ धावांवर पंजाबला दुसरा धक्का बसला. त्यानंतर संघाची धावसंख्या ८२ असताना लियम लिव्हिंगस्टोनही तंबूत परतला. पीयूष चावलाने लिव्हिंगस्टोन आणि तायडे यांना तंबूचा रस्ता दाखवला.


लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव ढेपाळला होता. पण त्याचवेळी कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत सिंह यांनी डावाला आकार दिला. दोघांनी वेगाने धावा जमवल्या. सॅम करन आणि हरप्रीत भाटिया या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० चेंडूंत ९२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर सॅम करन बाद झाला. सॅम करन याने चार षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने २९ चेंडूंत ५५ धावांची खेळी केली. तर हरप्रीत सिंहने ४१ धावा तडकावल्या. सॅम करन बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडला. जितेश शर्माने सात चेंडूंत चार षटकार लगावत २५ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या