मुंबई: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया आज देशासह राज्यात अक्षय्य तृतीया सण उत्साहात साजरा होत आहे. आज सराफा बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. सोन्याच्या विक्रमी वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ६० हजार १९१ रुपयांवर येऊन पोहोचली आहे. सोन्याच्या दरात ४२५ रुपयांनी घसरण झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे जरी सराफा बाजारात गर्दी असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ही गर्दी कमी आहे. मात्र, ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकत्र आल्याने सोन्याची मोठी खरेदी होईल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारीही चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव ६४६ रुपयांनी घसरून ७४ हजार ७७३ रुपये प्रति किलोवर आला आहे. –
देशातील दोन प्रमुख शहरांतील चांदीचे आणि सोन्याचे दर
दिल्ली: २४ कॅरेट सोने – ६१ हजार ३०० रुपये, २२ कॅरेट सोने – ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम
मुंबई: २४ कॅरेट सोने – ६१ हजार १५० रुपये, २२ कॅरेट सोने – ५६ हजार ०५० रुपये प्रति १० ग्रॅम
दिल्ली : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो
मुंबई : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो