Friday, May 9, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

नितीन इन लंडन

नितीन इन लंडन


  • नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज



भालचंद्र नाईक हे नाट्य व्यवस्थापनातले महागुरू होते. नितीन नाईक हा त्यांचा मुलगा वडिलांचे बोट धरून तो सुद्धा नाट्य क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून आला. वडिलांची पाच दक्षकाची तपश्चर्या त्याने जवळून पाहिली होती. काटकसर, निराशा, वेळीअवेळी येणे या धगधगत्या प्रवासात कधीतरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा त्याने पाहिली होती. असे असतानाही वडिलांचे बोट त्याने आवळून धरले होते. तुम्ही काम किती करता यापेक्षा विश्वासार्हताला किती जागता हे चतुर निर्माता प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अनुभव असतो. भरमसाट काम घेऊन व्यवस्थापन करण्यापेक्षा अवलोकन करून नाटकाला वेळ देणे हा नितीनच्या कामाचा मंत्र आहे. मोजके पण प्रेक्षकप्रिय कितीतरी नाटकांचे त्याने व्यवस्थापन केले आहे. सध्या अमर फोटो स्टुडिओ, अ परफेक्ट मर्डर नाटकाचे तो व्यवस्थापन पाहतो. त्याच्या नम्र, प्रांजळ, इमानदार स्वभावामुळे पूर्वी दुबई आणि आता लंडनची वारी करण्याची संधी त्याला मिळाली आहे. तसे या दोन्ही ठिकाणी महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या युवकाला जाणे तसे कठीण नाही. ‘खरं खरं सांग’ या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे यांनी आनंद इंगळे, ऋतुजा देशमुख, सुलेखा तळवलकर, राहुल मेहंदळे या कलाकारांसोबत ‘नितीन इन लंडन’ म्हणावे अशा स्मार्ट शहरात घेऊन गेले आहेत. रंगमंचाच्या मागच्या व्यवस्थापकाला असा मान मिळणे क्वचितच वाट्याला येतो. जे मोजके गेले त्यात आता नितीनचे ही नाव जोडले जाणार आहे. वडिलांनी आयुष्यभर व्यावसायिक नाटके, वाद्यवृंद यांची परदेशात प्रयोग करण्याच्या दृष्टीने झुळझुळ केली. पण त्यांना जाण्याचा योग काही आला नाही. आता नितीन गेलेला आहे. सोबत वडिलांचा अनुभव, स्मृती आहेत हे वेगळे सांगायला नको.

Comments
Add Comment