मानसा: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक सिमला मिरची पेरण्याचे आवाहन केल्याने मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले, खरे पण जास्त उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांवर शिमला मिरची रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना शिमला मिरची घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. पण तिथे शेतकऱ्यांच्या शिमला मिरचीला प्रति किलो १ रुपया किंमत मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अक्षरश: शिमला मिरचीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून शेतकऱ्यांनी शिमला मिरची रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली.
इथे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तर पंजाबमध्ये आवक जास्त असूनही शेतमालाला भाव मिळत नाहीय. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत.
दरम्यान, अधिक आवक पाहून व्यापाऱ्यांनी शिमला मिरची १ रुपये किलोने विकण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले. पंजाबमध्ये ३ लाख हेक्टरमध्ये हिरव्या भाज्यांची पेरणी केली जाते. शिमला मिरचीचे उत्पादन १५०० हेक्टरमध्ये होते. फिरोजपूर, संगरूर आणि मानसा जिल्ह्यात शिमला मिरचीची सर्वाधिक लागवड होते.