Thursday, July 10, 2025

अनर्थ घडला! रशियाने स्वत:च्याच देशात बॉम्ब टाकला, स्फोटामुळे हाहाकार!

अनर्थ घडला! रशियाने स्वत:च्याच देशात बॉम्ब टाकला, स्फोटामुळे हाहाकार!

बेल्गोरोड (रशिया) : युक्रेनच्या सैन्याविरुद्ध संघर्ष सुरू असताना रशियन लढाऊ विमानाने चुकून स्वत:च्याच देशातील बेल्गोरोड या शहरावर बॉम्ब हल्ला केला. त्यामुळे या भागात हाहाकार माजला असून रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील नागरिकांना भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रशियन न्यूज एजन्सी TASS ने या घटनेला दुजोरा दिला आहे.



रशियाच्या लढाऊ विमानातील सैनिकांकडून गुरुवारी रात्री ही मोठी चूक झाली. युक्रेनला प्रत्युत्तर देताना रशियाच्या लढाऊ विमानाने आपल्याच देशातील बेल्गोरोड या शहरात बॉम्ब टाकला. हा बॉम्ब इतका मोठा होता की शहरात सुमारे ४० मीटर अंतरापर्यंतचा खड्डा पडला.


एका एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 'स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वा दहाच्या सुमारास एसयू-३४ हे लढाऊ विमान बेल्गोरोड शहरावरून जात होते. यावेळी चुकून हा बॉम्ब पडला.

Comments
Add Comment