मोफत एसटी प्रवास सवलत योजनेचा बोजवारा!
८३ वर्षीय वृद्धाकडून घेतले टिकीट!
- बाळासाहेब भालेराव
मुरबाड : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने ७५ वर्षे पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता यावा या हेतूने १६ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ७५ वर्षांपुढील वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र या योजनेचा बोजवारा उडालेला दिसत आहे.
आज दि. २१ एप्रिल रोजी ८३ वर्षाचे धोंडू पदु भला (रा. फागुळगव्हाण) हे मुरबाड बस डेपोच्या कल्याण अवसरी बसने मोरोशी ते टोकावडे अशा १२ कि.मी. अंतरासाठी प्रवास केला. ते वयोवृद्ध असूनही त्यांच्याकडून १० रुपये टिकिट घेतले असल्याचे निदर्शनास आले.
मी कल्याण ते आळेफाटा प्रवास अधुन मधुन करतो. ही योजना सुरू झाल्यापासून कधीच टिकीट घेतले नव्हते. परंतू या वाहकाने तिकाटासाठी हट्ट धरला. मी संबंधित एसटी वाहक यांना विचारले असता, त्यांनी माझ्याशी हुज्जत घातली – धोंडु भला, प्रवासी
कितीतरी वयोवृद्ध बसमध्ये येतात, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु वयोवृद्धांकडून टिकीट घेतलेल्या संबंधित वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुरबाड बस आगार प्रमुख यांच्याकडे करित आहोत – राजेश भांगे, मुरबाड उप तालुकाप्रमुख शिवसेना