लोकसभेला ४६, विधानसभेत १९० जागा जिंकणार
सांगली (प्रतिनिधी) : २०३० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४६, तर विधानसभेच्या १९० जागा भाजप जिंकेल, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान नारायण राणे यांनी यावेळी ‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, असे सांगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मी तसे काही बोललोच नाही’, असे स्पष्टीकरणही दिले.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. राज्यातील शिंदे-भाजपचे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे टिकेल. राज्यातील सरकार चांगले काम करीत असल्याचे सांगितले.
४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट
नारायण राणे म्हणाले, लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत भाजपने ४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्याकडे दक्षिण गोवा, दक्षिण मुंबई व सांगली लोकसभेची जबाबदारी आहे. गतवेळेपेक्षा सांगलीचा खासदार तीन लाख मतांनी विजयी होईल. एकसंघ व एक विचाराने भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय, विविध योजना, भाजपचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांची भेट नाही
अजित पवार यांच्या राजकीय हालचालीबाबत राणे म्हणाले की, काही महिन्यांपासून त्यांची भेट झालेली नाही. दूरध्वनी झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वरिष्ठ नेते बघतील, तपासून घेतील. असे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.