नवी दिल्ली: सध्या सगळीकडे आयपीएलचा धमाका सुरु आहे. अॅपलचे सिईओ टीम कूक यांनाही आयपीएलची भूरळ पडली आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना बघण्यासाठी ते थेट सोनम कपूरसोबत दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमला हजेरी लावली होती. टीम कूक यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद अहुजाही त्यांच्यासोबत आयपीएलची मॅच पाहण्यासाठी आला होता.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीम कूक यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या या सामन्याचा कूक यांनी चांगलाच आनंद घेतल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
अॅपलचे सिईओ टीम कूक इथे राहण्याचा तुम्ही आनंद घेतला असेल, अशी आशा आहे. भारतातील अॅपलच्या स्टोरमधून तुम्ही दिलेला हा वर्ल्ड क्लास अनुभव आम्हाला घेता यावा यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार, असं सोनमने फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, गुरुवारी खेळवण्यात आलेल्या कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करत असतानाच दिल्ली संघाने ४ विकेट्सने हा सामना जिंकला आहे.