
नवी दिल्ली: गेल्या पाच ते सहा वर्षापासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का समजला जात आहे.