Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ५० हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

नाशिकमध्ये ५० हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

निवास, कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वर्दळ

नाशिक (प्रतिनिधी ): शहरात एकाच वेळी पन्नासहून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी तब्बल ७५ ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत.

नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. ७४ ठिकाणांवर जवळपास १५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.

आयकर विभागाने अचानक हे छापे टाकले आहेत. तसेच शहरातील अत्यंत नामांकीत बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या बांधकाम व्यावसायिकांकडील सर्व कागदपत्रांची छाननी, बँक खात्यांचा तपशील अशा सर्वच बाबींची पडताळणी या पथकांनी सुरू केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -