राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर लोकेश राहुलने केले कौतुक
जयपूर (वृत्तसंस्था) : लखनऊने बुधवारी राजस्थानवर अनपेक्षित विजय मिळवला. या विजयानंतर लखनऊचा कर्णधार लोकेश राहुलने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केल्याचे लोकेश म्हणाला.
विजयानंतर लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल म्हणाला की, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर आर्द्रता नव्हती, त्यामुळे दोन्ही संघांसाठी समान संधी होती. सामन्यासाठी इथे आल्यावर आम्हाला वाटले की इथे १८० धावा होऊ शकतील. मात्र आम्ही काही धावा कमी केल्या. इथे चेंडू थोडा खाली राहत होता. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये आम्ही स्वतःला थोडा वेळ दिला. आम्ही आणखी थोडे चांगले खेळलो असतो तर १७० धावाही झाल्या असत्या. मात्र आमच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि सामन्यात आमचे आव्हान कायम ठेवले. आम्हाला माहिती होते की राजस्थानची ताकद टॉपचे ४ फलंदाज आहेत. म्हणून त्यांना आऊट करण्यासाठी आम्हाला प्लॅन बनवण्याची गरज होती.