नवी मुंबई: खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या श्री सदस्यांची भाजपा आमदार नितेश राणे यांनी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रत्येक श्री सदस्या सोबत संवाद साधत त्यांच्या प्रकृतीत कितपत आराम पडलेला आहे, याबाबतची चौकशी केली. आमची प्रकृती सुधारत आहे. आम्हाला आता बरे वाटत आहे. रुग्णालयात उपचार योग्य पद्धतीने व्यवस्थित मिळत आहेत असे श्री सदस्यांनी आमदार नितेश राणे यांना सांगितले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याशीही चर्चा केली व उपचार पद्धतीची माहिती घेतली.
आमदार नितेश राणे यांनी केली श्री सदस्यांची विचारपूस
