Saturday, May 17, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

'पॉवर प्ले'मध्ये रहाणे सरस

'पॉवर प्ले'मध्ये रहाणे सरस

सर्वाधिक स्ट्राईक रेटने जमवल्या धावा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संथ फलंदाजीमुळे एकदिवसीय, टी-२० आंतरराष्ट्रीय संघातून वगळलेल्या अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आतापर्यंत 'पॉवर प्ले'मध्ये रहाणेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे याबाबतील 'रन मशीन' विराट कोहली आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा या दोघांनाही रहाणेने मागे टाकले.


आयपीएल २०२३मध्ये आतापर्यंत पॉवर प्लेमधील सर्वात जास्त स्ट्राईक रेट अजिंक्य रहाणेचा आहे. रहाणेने पॉवर प्लेमध्ये २२२.२२ च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. यानंतर मीडल ओव्हर म्हणजे मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरन हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरनने सर्वाधिक २२६.६७च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या आहेत. तसेच डेथ ओव्हर म्हणजे शेवटच्या ३० चेंडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिलक वर्माच्या नावावर आहे. तिलक वर्माने शेवटच्या षटकांमध्ये २५१.७२च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment