नवीन नाशिक(प्रतिनिधी) : सहाय्यक गुन्हे कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून पोलीस अंमलदार संजय सपकाळे यांचा सहाय्यक गुन्हे कल्याण समितीचे चेअरमन डॉ महेश थोरात व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज रुईकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात सत्कार करण्यात आला. पोलीस अंमलदार संजय सपकाळे यांनी काही दिवसापूर्वी त्रिमूर्ती चौक येथे मद्यपी टवाळखोरांना चांगलाच चोप दिला होता. ते सिडको परिसरात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते अंबड पोलीस ठाण्यात बिट मार्शल म्हणून कार्यरत आहेत.
याप्रसंगी अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुरज बिजली, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, संतोष संगम, सचिन जाधव सुचीतसिंग सोळुंके, मयूर पवार, अशोक आव्हाड, सचिन सोनवणे, केशव ढगे तुषार मते आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.