
अजित पवारांनी बोलावली आमदारांची बैठक, भुजबळांसह दिग्गज नेते उपस्थित
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीला देखील हजेरी लावली. मात्र आज राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत.
अजित पवार यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी येथे पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते उपस्थित आहेत. अजित पवार यांनी बैठक बोलावल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.