Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीउन्हाच्या तडाख्याने विजेच्या मागणीत वाढ

उन्हाच्या तडाख्याने विजेच्या मागणीत वाढ

मुंबईत ३ हजार ८९३ मेगावॉटची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याने राज्यभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी एसी, पंखा कुलर आदी उपकरणांचा आधार घेऊ लागले आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे.

बुधवारी मुंबईत तब्बल ३ हजार ८९३ मेगावॉट विक्रमी विजेची मागणी नोंद झाली. तर राज्यात २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी नागरिकांकडून पंखा, कुलर आणि एसी अशा विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करत आहेत. यामुळे मुंबईसह राज्यभरातून विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.

मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर मुंबईत ३ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबईसह राज्यभरातून एकूण २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली.

ग्राहकांच्या मागणीनुसार वीज वितरण कंपन्यांकडून विजेचा पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याने कोणत्याही भागात भारनियम करण्यात येत नाही. मात्र दिवसेंदिवस विजेची मागणी वाढू लागल्याने कंपन्या वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई महानगर प्रदेशाला वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडामुळे ठाणे रायगड जिल्ह्यांतील काही भाग अंधारात गेला. मात्र, वीज कंपन्यांनी खबरदारी घेतल्याने महानगराला भारनियमनापासून दिलासा मिळाला. मावळ तालुक्यातील किवळे गावाजवळील डोंगराळ भागात आगीमुळे खारघर-तळेगाव वीज वाहिनीमध्ये बुधवारी दुपारी १.५५ वाजता तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी जंगलात लागलेली आग ३.४५ वाजता आटोक्यात आणली व वीज पुरवठा सुरळीत केला. यामध्ये सुमारे ३४७ मेगावॅटचे भारनियमन करावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -