देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चांना ऊत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. स्वत: अजित पवार यांनी काल या चर्चांना पूर्णविराम दिला असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चांना ऊत आले आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मिशन नो पेन्डसी' म्हणत दोन फोटोंसह एक ट्विट केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे कार्यालयीन काम करताना दिसत असून फोटोला 'Office work. Clearing pendencies..', असे कॅप्शनही फडणवीसांनी दिले आहे. राज्यात एकीकडे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.





कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोबत मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी दिला आहे. या ट्विटमधील फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिगारा दिसत आहे. त्यातील काही फायलींवर देवेंद्र फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचे ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.


राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवार यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा ट्विटमुळे त्यावर पुन्हा चर्चा होताना दिसत आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशात सरकार अल्पमतात आलेच तर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपची संभाव्य रणनीती आहे, अशी चर्चा अजूनही कायम आहे. राजकीय तज्ज्ञदेखील अजूनही अजितदादा व भाजपची हातमिळवणी होण्याच्या शक्यतेचे दावे करत आहेत.


अशातच देवेंद्र फडणवीसांनी 'मिशन नो पेन्डसी' म्हणत फोटो ट्विट केल्याने फडणवीसांनी कामाची आवराआवर का सुरू केली?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाणार, अशी शक्यता भाजपलाही वाटत आहे का? त्यामुळेच पुढील रणनितीबाबत देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट तर केले नाही ना?, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.


मंगळवारी अजित पवारांबाबतच्या चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस मात्र शांतच होते. अजित पवारांच्या गोटात होत असलेल्या सर्व घडामोडींवर ते बारीक लक्ष ठेवून होते. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. अजित पवारांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडण केल्यानंतर या चर्चा आता थंड झाल्या होत्या. मात्र, तोच देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट करुन राजकीय चर्चांना पुन्हा हवा दिली आहे.

Comments
Add Comment

BMC : महापालिका कीटक नाशक विभागातील कामगाराचा टाकीत पडून मृत्यू; नायगाव बीडीडी चाळीत पाण्याच्या टाकीची पाहणी करताना घडली दुर्घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातील कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर

BMC News : यंदाही समुद्रात मूर्ती विसर्जनाची परवानगी द्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींना समुद्रात

BMC : महापालिका शीव रूग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्या; महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश

रूग्णालय कर्मचारी उपस्थिती पडताळणीसाठी एआयचा वापर करण्याचेही

Sarbananda Sonowal : ‘ई-समुद्र’ डिजिटल मंचाचा शुभारंभ; सागरी प्रशासनाच्या डिजिटायझेशनकडे भारताची मोठी झेप

मुंबई : भारताने सागरी प्रशासनाच्या डिजिटायझेशनच्या दिशेने मोठे पाऊल टाकत ‘ई-समुद्र’ या सर्वसमावेशक डिजिटल

Law Admission Update : 16 कॉलेजांना 100% प्रवेशाची परवानगी; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक

Central Railway Mega Block : शीव आरओबीच्या कामासाठी माटुंगा-कुर्ला दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; लोकल व एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मि