नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या कर्ज फरत फेडण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात अदानीने घेतलेल्या कर्जात सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी जागतिक बँकांचे या कर्जातील प्रमाण एक तृतीयांशने वाढले आहे. मार्चअखेर अदानी समूहाने घेतलेल्या कर्जांपैकी २९ टक्के कर्ज हे जागतिक बँकांकडून देण्यात आले आहे. ज्याअर्थी जागतिक बँका अदानीला कर्ज देत आहेत त्याअर्थी अदानी समुहाची झाकोळलेली प्रतिमा जागतिक बाजारपेठेत उंचवल्याचे चित्र आहे.
अदानी समूहाच्या ७ सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत २०.७ टक्क्यांनी वाढले. ते २.३ लाख कोटी रुपये (२८ अब्ज डॉलर) इतके वाढले आहे. अदानी समूहाच्या कर्जामध्ये बाँड्सचा वाटा ३९ टक्के आहे. २०१६ मध्ये तो १४ टक्के होता. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने अदानी समूहाला सुमारे २७० अब्ज रुपये (३.३ अब्ज डॉलर) कर्ज दिले आहे. एसबीआयच्या अध्यक्षांनी फेब्रुवारीमध्ये ही माहिती दिली होती.