Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीकर्नाटक निवडणुकीच्या भाजपच्या ४० स्टार प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील 'हे' २ नेते

कर्नाटक निवडणुकीच्या भाजपच्या ४० स्टार प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील ‘हे’ २ नेते

भाजपने ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले

मुंबई : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून कोणत्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा एकदा कर्नाटकचा गड जिंकायचा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच भाजपाने ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील २ नेत्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकमध्ये प्रचारासाठी सभा घेणार आहेत. या यादीमध्ये अर्धे केंद्रीय मंत्रीमंडळ व ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचीही नावे आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, ४० जणांची नावे असून महाराष्ट्रातून नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -