नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत जे लोक संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे १६ एप्रिल रोजी ग्वाल्हेरमध्ये आंबेडकर महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली होती. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरणात आहेत.