अलिबाग (प्रतिनिधी) : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा १६ एप्रिल रोजी पार पडला. तथापि या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात दुर्दैवाने ९ महिला व ४ पुरुष असे एकूण १३ श्री सदस्य मृत्यमुखी पडले, तर १२ व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. ३५ व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सर्व मृतांमध्ये तुळशीराम भाऊ वागड, जयश्री जगन्नाथ पाटील, महेश नारायण गायकर, कलावती सिद्ध्रराम वायचाळ, मंजूषा कृष्णा भोंबडे, भीमा कृष्णा साळवी, सविता संजय पवार, स्वप्नील सदाशिव केणी, पुष्पा मदन गायकर, वंदना जगन्नाथ पाटील, मीनाक्षी मोहन मेस्त्री, गुलाब बबन पाटील, विनायक हळदणकर यांचा समावेश असून, त्यांची ओळख पटली आहे.