मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र् दिनाचे औचित्य साधून संपन्न होणार आहे. ‘अर्थ’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेतर्फे दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मश्री दादा इदाते (सामाजिक), पद्मश्री गिरीश प्रभुणे (शैक्षणिक), पद्मश्री राहीबाई पोपेरे (कृषी), शैलेश गांधी (सामाजिक), अनिल गलगली (सामाजिक), हेमा राचमाले (सामाजिक), प्रवीण दीक्षित (प्रशासकीय), अवंतिका चव्हाण (क्रीडा), मनीष अडविलकर (क्रीडा), महेश कोठारे (सांस्कृतिक आणि मनोरंजन), आकाश ठोसर (सांस्कृतिक आणि मनोरंजन), अविनाश चंद्रचूड व विश्वजीत जोशी (सांस्कृतिक आणि मनोरंजन), महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (आरोग्य), डॉ. पंकज चतुर्वेदी, उप-संचालक, टाटा मेमोरियल सेंटर, (आरोग्य), योगेश लखानी (उद्योग क्षेत्र), नितीन पोतदार (आर्थिक क्षेत्र), य. दु. जोशी (मराठी पत्रकारिता), राहुल गडपाले (मराठी पत्रकारिता), धर्मेंद्र जोरे ( इंग्रजी पत्रकारिता), पॉला मॅकग्लिन (डिजिटल), मधुरा बाचल (डिजिटल), फोकस इंडिया (डिजिटल), रतन लथ (शैक्षणिक), प्रोफेसर उल्हास बापट (शैक्षणिक), गोल्डस जिम (फिटनेस), दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन) या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.