Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीआता ॲपलचा मोबाईल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन घ्या!

आता ॲपलचा मोबाईल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन घ्या!

मुंबई: आता ॲपलचा फोन त्याच्या रिटेल स्टोअरमध्ये जाऊन विकत घेणं शक्य होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं भारतातील ॲपलचं (Apple) चं पहिलं स्टोअर बीकेसी येथे सुरु झाले आहे. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमधील या स्टोअरचे उद्घाटन ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी केले.

हे स्टोअर २० हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले असून लोकांमध्ये ॲपल उत्पादनांची इतकी क्रेझ आहे की स्टोअर उघडण्यापूर्वीच सकाळी ११ वाजल्यापासून स्टोअर बाहेर ग्राहकांची झुंबड उडाली होती. या स्टोअरमध्ये १०० सदस्यांची टीम ग्राहकांसाठी कार्यरत असणार आहे. तर या ॲपल स्टोअरमध्ये तब्बल २० भाषांमध्ये ग्राहक सेवा उपलब्ध असणार आहेत.

ॲपलच्या मुंबईत उघडलेल्या पहिल्या स्टोअरचे नाव ॲपल बीकेसी (Apple BKC) आहे. कंपनी या स्टोअरसाठी दर महिन्याला ४२ लाख रुपये भाडे देणार आहे आणि नफ्याचा काही भाग स्टोअर मालकालाही दिला जाईल. यानंतर ॲपलने घोषणा केली आहे की, मुंबईनंतर देशातील दुसरे ॲपल स्टोअर हे २० एप्रिल रोजी दिल्लीत सुरू होणार आहे. सिलेक्ट सिटी वॉक मॉल, साकेत येथे दुसरे ॲपल स्टोअर सुरू होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -