Saturday, October 18, 2025
Happy Diwali

हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे काढून हातात देईन...

हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे काढून हातात देईन...

आमदार नितेश राणे यांचा जळजळीत इशारा

अहमदनगर: अहमदनगरमध्ये कापड बाजारात झालेल्या दोन हिंदू व्यापाऱ्यांवरील हल्ल्याचा समाचार घेत, आमदार नितेश राणे यांनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे काढून हातात देईन, असा घणाघाती इशारा दिला आहे. मिट्टी में मिला देंगे फक्त युपीमध्ये होत नाही तर महाराष्ट्रात देखील होतं. आमच्याकडे पण मेडिकल चेकअपला घेऊन जातात. आमच्याकडे पण पत्रकार आणले जातात असाही जळजळीत इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

आज नगर येथील कापड बाजारात नितेश राणे यांना तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी निवेदन दिले त्यानंतर नितेश राणे यांनी तिथे सभा घेतली व अतिक्रमण करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. कापड बाजारातील अतिक्रमणांचा समाचार घेत नितेश राणे म्हणाले, इथे एक दिवस अतिक्रमण हटवली जातात ती पुन्हा येथे येऊन बसतात. यांच्या दुकानांमध्ये हत्यार असतात ती काय आमची सत्यनारायणाची पुजा घालायला ठेवली आहेत का? माझ्या हिंदू व्यापाऱ्यांना येथे स्वसंरक्षणासाठी बंदूका मिळवायला मला दोन-दोन महिने पाठपुरावा करावा लागतो, या शब्दांत नितेश राणे यांनी पोलिसांचाही समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, पोलिसांनी क्रॉस केसेस टाकल्या त्या का टाकल्या ते आम्हाला कळत नाही का. इथे रस्त्याने चालणाऱ्या माझ्या महिला भगिनींवर कमेंट्स पास करणाऱ्यांना दोन पायावर घरी जाता येणार नाही. मी काय इथे आमदार म्हणून फक्त शो करायला आलेलो नाहीये तर पूर्ण तयारीनीशीच आलो आहेच अशी चेतावनीच नितेश राणे यांनी दिली. यांचा एकदाच जयश्रीराम करायचा जर पोलिसांनी तुम्हाला सहाकार्य केलं नाही तर यांचा हर हर महादेव करायची वाट पाहू नका असेही नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे यांनी, ते कोरोनाचं वॅक्सीन असतं ना तसं माझ्याकडेही वॅक्सीन आहे ते आता बाहेरच काढतो. फक्त कोरोनाचं वॅक्सीन हातावर देतात मी ढुंगीवर देतो, असा कडकडीत इशारा देत येथील हिंदू व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे आणि यापुढे तुम्हाला तक्रार करावी लागणारच नाही असा शब्द दिला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >