भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंकज उदास, विद्या बालन, प्रसाद ओक यांना


मुंबई (प्रतिनिधी) : यंदाचा मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण आशा भोसले यांना दिला जाणार आहे. तर मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक पंकज उदास, अभिनेत्री विद्या बालन, अभिनेते प्रसाद ओक, साहित्य निर्मितीसाठी 'ग्रंथाली' प्रकाशन, नाटकासाठी प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या वतीने निर्मिती केलेल्या 'नियम व अटी लागू' या नाटकासा, समाज सेवेसाठी श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्ट या संस्थेला हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, हृदय आर्टसचे संचालक अविनाश प्रभावळकर, संस्थेचे सदस्य रवींद्र जोशी हे उपस्थित होते.


मास्टर दिनानाथजी यांच्या ८१व्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार जाहीर केले जात होते. गेल्या वर्षापासून त्यांच्या नावाचा पुरस्कार देणे सुरू केले आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिला होता.


२४ एप्रिल संध्याकाळी सहा वाजता श्री षण्मुखानंद सरस्वती हॉल येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मध्यंतरानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रख्यात गायक हरिहरन, डॉ. राहुल देशपांडे यांचा या कार्यक्रमांमध्ये सहभाग असून कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमात आसामच्या नृत्यांगना मेघरंजनी मेधी, मरामी मेधी यांचा सहभाग असणार आहे. पं. जयप्रकाश मेधी, प. प्रांशू चुरीलाल, विनय मुंढे, शुभम उगले यांचाही यात गायक, वादक कलाकार म्हणून सहभाग आहे. हा कार्यक्रम मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदय आर्टस यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या