भिवंडी: भिवंडी शहरातील म्हाडा कॉलनी नदीनाका परिसरातील आफरीन बेकरीमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने बेकरीतील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान व निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. या बेकरीमध्ये असलेल्या साहित्यात मोठा ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. यापूर्वी मागच्या महिन्यात याच ठिकाणी आग लागल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली आहे.