Sunday, May 18, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी काल (रविवारी) एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या मृत उमेदवाराचे नाव आहे. बीकेसी येथे पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेत सचिन सहभागी झाला होता.


मैदानी चाचणीवेळी धावताना सचिन मैदानात कोसळला त्यानंतर त्याला उपचाराकरता जवळील शासकिय रुग्णालय व्ही. एन. देसाई याठिकाणी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सचिन कदम या उमेदवाराचा मृत्यू झाला.


सचिन कदम हा कल्याणहून पोलीस भरतीसाठी आल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Comments
Add Comment