Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईची विजयी घोडदौड सुरूच; कोलकात्यावर पाच विकेटने मात

मुंबईची विजयी घोडदौड सुरूच; कोलकात्यावर पाच विकेटने मात

ईशान किशानचे अर्धशतक आले कामी; व्यंकटेश अय्यरची शतकी खेळी व्यर्थ

मुंबई (प्रतिनिधी) : ईशान किशानचे अर्धशतक आणि सूर्या – टीम डेविडची छोटेखानी खेळी यांच्या बळावर रविवारी मुंबईने कोलकात्याचा पाच विकेटने पराभव केला. मुंबईचा यंदाच्या हंगमातील हा सलग दुसरा विजय होय. ईशानच्या अर्धशतकापुढे व्यंकटेश अय्यरची शतकी खेळी फिकी पडली. सूर्या आणि टीम डेविड यांनीही मोठे योगदान दिले. रविवारी आयपीएल २०२३ मधील डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगला. मुंबई संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यात पराभव, तर आता दोन सामने जिंकले आहेत. कोलकाताने आता पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.

ईशान किशन याने वानखेडे मैदानावर पहिल्या चेंडूपासून धावांचा पाऊस पाडला. ईशान किशनने २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. ईशान याने रोहित शर्मासोबत २९ चेंडूत ६५ धावांची सलामी दिली.

ईशान किशन याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने २५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. तिलक वर्मा याने एक षटकार आणि तीन चौकारासह ३० धावांचे योगदान दिले. तर टीम डेविड याने २४ धावांची विजयी खेळी केली. रोहित शर्मा याने १३ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकाराचा सामावेश आहे. कोलकात्याकडून सुयश शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्गुसन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.दरम्यान, व्यंकटेश अय्यर याच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकात्याने निर्धारित २० षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात १८५ धावांपर्यंत मजल मारली. रसेल याने अखेरच्या षटकात ११ चेंडूत २१ धावांचे योगदान दिल्यामुळे कोलकाता सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचू शकले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. नारायण जगदीशन खातेही न उघडता तंबूत परतला. कॅमरुन ग्रीन याने त्याचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर गुरबाजही आठ धावा काढून बाद झाला. एका बाजूला व्यंकटेश अय्यर धावांचा पाऊस पाडत होता. पण दुसऱ्या बाजूला विकेट पडत होत्या. कर्णधार नीतीश राणा पाच धावा काढून बाद झाला. शार्दुल ठाकूर १३, रिंकू सिंह १८ धावा काढून बाद झाले.

व्यंकटेशचा शतकी धमाका…

वानखेडेच्या मैदानावर वव्यंकटेश अय्यर याने पहिल्या चेंडूपासूनच धावांचा पाऊस पाडला. व्यंकटेशने ५१ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला व्यंकटेशने धावांचा पाऊस पाडला. व्यंकटेशने आपल्या शतकी खेळीत नऊ षटकार आणि सहा चौकार लगावले. अय्यरच्या शतकी खेळीला रायली मेरिडेथ याने संपुष्टात आणले. विशेष म्हणजे, आयपीएलच्या सोळा वर्षात कोलकात्यासाठी हे फक्त दुरे शतक होय. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रॅडन मॅक्युलम याने १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याकडून एकही शतक झळकावण्यात आले नव्हते. आज वेंकटेश अय्यर याने शतकी खेळी करत कोलकात्याचा शतकी दुष्काळ संपुष्टात आणला.

मुंबईची गोलंदाजी कशी –

मुंबईच्या फिरकी गोलदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. पीयुष चावला याने चार षटकात १९ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर शौकिन याने चार षटकात दोन विकेट घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दसुन जानसेन, रायली मेरिडेथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. दसुन जानसेन महागडा ठरला. त्याने चार षटकात ५३ धावा खर्च केल्या. अर्जुन तेंडुलकर याने दोन षटकात १७ धावा दिल्या.

अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे आज आयपीएलमध्ये पदार्पण झाले. अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सने आज पदर्पणाची संधी दिली. मागील दोन वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ताफ्यात होता. पण त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. मुंबईने आज अर्जुनला संधी दिली. मुंबईने अर्जुनला २५ लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. २०२१ आणि २०२२ मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाचा भाग होता.. पण त्याला प्लेईंग ११मध्ये स्थान दिले नव्हते. आज रोहित शर्माने अर्जुनला पदार्पणाची कॅप दिली. कोलकात्याविरोधातील सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची कॅप दिली. प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाल्यानंतर अर्जुनला आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज रोहित शर्मा प्लेईंग ११ चा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेृतृत्व केले. सूर्यकुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. सूर्याने पहिल्या षटकात अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या. अर्जुनचजया दुसऱ्या षटकात तेरा धावा निघाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -