Saturday, July 13, 2024
Homeराशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ एप्रिल २०२३

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ एप्रिल २०२३

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, रविवार दि. १६ ते शनिवार २२ एप्रिल २०२३

आर्थिक लाभ होतील
मेष – आठवडा आपल्याला अनुकूल स्वरूपाचा जाईल. आपल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आत्मविश्वासात वृद्धी करणारा ठरेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हातात घ्याल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन योजना तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. त्याचा आपला व्यवसायावर पोषक परिणाम होईल. भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद टाळा. समज गैरसमज नको. व्यवसायाचे हित लक्षात घ्या. नोकरीच्या ठिकाणी काही क्लिष्ट समस्या आपण सोडवू शकाल. वरिष्ठांबरोबर असलेले संबंध सुधारतील. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. त्याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होईल.
जुन्या गुंतवणुका फायदा देतील
वृषभ – या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवा. इतरत्र वेळ वाया न घालवता कार्यमग्न राहणे महत्त्वाचे ठरेल. आलेल्या नवीन संधीमुळे आपले रोजचे जीवन बदलू शकते. प्रगती उन्नती करू शकाल. आर्थिक बाजू भक्कम राहिल्याने आपल्या मनातील नियोजन आपण प्रत्यक्षात आणू शकाल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. नवीन करारमदार करू शकाल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून योग्य कालावधी आहे. नवीन संकल्पनांचा वापर फायदेशीर ठरेल. भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत व्यावहारिक दृष्ट्या महत्त्वाचे करू शकते. नोकरीमधील वातावरण सर्वसामान्य राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मतभेदाचे किंवा वादविवादाचे प्रसंग युक्तीने हाताळा त्यात यश येईल जुन्या गुंतवणुका फायदा देतील.
मदत मिळेल
मिथुन – हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसिद्ध ठरतील. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक उद्भवलेल्या समस्या शांतपणे व प्रयत्नांद्वारे सोडवू शकाल. इतरांची मदत मिळेल. मात्र इतरांशी सौजन्याने व विनयशीलतेने वागण्याची गरज आहे. व्यवसाय धंद्यात काही वेळेस आर्थिक गरज निर्माण होऊ शकते तसेच कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहा. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे. विरोधकांचा विरोध प्रबळ होण्याची शक्यता आहे तसेच शत्रू व हितशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवून राहा. आपल्या ध्येयाच्या पाठपुराव्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन करू शकाल.
स्पर्धक बलवान होतील
कर्क –दीर्घकाळ रखडलेली अथवा प्रलंबित राहिलेले जमिनीचे तसेच स्थायी मालमत्तेचे व्यवहार गतिशील होऊन त्याचा पूर्णत्वाकडे प्रवास होईल. समाजातील काही मान्यवर व सन्माननीय व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभेल मित्रमंडळींच्या परिवारातून मदत मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. मात्र प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मन शांत ठेवून दृढ निश्चयाने लहान-मोठे निर्णय घ्या. आर्थिक लाभ संभवतो विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. परिवारातून मदत मिळेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती मनासारखी राहील. व्यवसायाची जागा बदलण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात थोडी प्रतिकूलता जाणवण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये स्पर्धक बलवान होतील तसेच नोकरीमध्ये राजकारण व गटबाजी जाणवू शकते.
धनलाभ
सिंह – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्यात यश मिळेल. कुटुंब परिवार तसेच आपल्या व्यवसाय-धंद्यात अथवा नोकरीत इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्यामुळे आपल्या समोरील कामे सहजी होतील जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवास सुखकर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धीचे योग आहेत. नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल; परंतु अधिकारांमध्ये वृद्धी होईल वरिष्ठांचे संबंध चांगले राहतील. त्यांचे मार्गदर्शन मिळू शकते. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील मुला-मुलींकडून काही चांगल्या वार्ता मिळाल्यामुळे आनंद साजरा कराल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. काहींचे कॉलेज कॅम्पसमधून नोकरी साठी सिलेक्शन होण्याची शक्यता.

चिंता नको
कन्या – सध्याचा कालावधी अनुकूल असला तरी काही बाबतीत आपल्याला सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः आर्थिक दृष्ट्या नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. उलाढाल वाढेल; परंतु जबाबदाऱ्या व खर्चही त्याच प्रमाणात वाढल्याने गोंधळून जाण्याची शक्यता. व्यवसायिक समस्या शांतपणे विचार करून मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात भागीदारीमुळे प्रश्न संपुष्टात येतील. चिंता नको. आर्थिक मदत मिळू शकते. येणाऱ्या कालावधीमध्ये यशाचे प्रमाण वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. कोणतेही लहान-मोठे निर्णय शांतपणे विचार करून घेतल्यास ते अचूक ठरून त्याचा फायदा होईल. कलाकार खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. प्रसिद्धी मिळू शकेल. सामाजिक कार्यात रस घ्यावासा वाटेल. सामाजिक मानसन्मान वाढेल.
रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक
तूळ – भाग्याची साथ मिळाल्यामुळे रखडलेली किंवा अर्धवट अवस्थेतील असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. व्यवसाय-धंद्यात अपुरे राहिलेले प्रोजेक्ट आता पूर्ण होतील. पण प्रयत्न मात्र त्यादृष्टीने केल्यास त्यात यश मिळेल. आर्थिक मदत मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्यास आपली कामे आपण पूर्ण करू शकाल. वेळेचा अपव्यय व आळस टाळणे हितकारक ठरेल. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. दूरचा प्रवास घडू शकतो. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंब परिवार अथवा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या जोडीदाराशी अथवा भागीदाराची मतभेद टाळणे गरजेचे राहील. सामाजिक अथवा सार्वजनिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन कार्यरत राहाल. अपेक्षित कामे मार्गी लावू शकाल. समाजातील मान्यवरांच्या सहवासात राहता येईल.

वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक
वृश्चिक – आपण घेतलेले निर्णय अचूक ठरल्याने पुढील कामे करण्यात उत्साह राहील. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. नवीन कामे हाती घ्यावीशी वाटेल तसेच त्या दृष्टिकोनातून नवे नियोजनही कराल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून काही नवीन बदल करण्याचे ठरवाल. हे नवीन प्रकारचे बदल आपल्या व्यवसायासाठी पोषक ठरतील. बदलत्या परिस्थितीनुसार बदल करावे लागतील. व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार कराल. आत्मविश्वासाने जरी निर्णय घेतले तरी वस्तुस्थितीची जाण ठेवणे हितकारक ठरेल. कुटुंब परिवारातून आपल्याला पाठिंबा मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल. बँकांची कामे होतील. काही वेळेस महत्त्वाचे काम प्रलंबित पडल्यासारखे वाटेल; परंतु आपले प्रयत्न अविरत ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.
गृह सौख्यात वृद्धी
धनु – नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल. वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठरला एखादी महत्त्वाची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. परदेशगमनाचे योग आहेत. त्याचा फायदा पण होईल. आर्थिक परिस्थिती उंचावेल. जे जातक नोकरीच्या शोधात होते. अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतींमधून यश मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील. विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह ठरून त्यांना आपला मनासारखा जोडीदार जीवन साथी म्हणून निवडता येऊ शकतो. प्रेमात यश संभवते. भावनांवर नियंत्रण आवश्यक राहील. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल जीवनसाथीची नात्यात गोडवा राहील. गृह सौख्यात वृद्धी होईल. कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील.
विशेष प्रयत्न करावे लागतील
मकर – सदरील काळामध्ये कधी चांगले तर कधी गोड अनुभव येतील. दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल; परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये समस्या तसेच विलंब होऊ शकतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. आपला राग कुटुंबीयांवर काढू नका स्वतः आपल्या कार्यामध्ये प्रयत्नशील व कार्यरत राहिल्यास यश आपलेच आहे हे लक्षात ठेवा. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. आजचे काम उद्यावर ढकलणे महागात जाण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते काही खर्च अचानक करावे लागतील. घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन चकित करू शकते. कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम करण्याचे नियोजन होईल. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. नोकरीमध्ये आपल्या कामाच्या ज्ञानाविषयी अद्यावत राहणे आवश्यक ठरणार आहे. वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
वाद-विवाद दुर्लक्षित करा
कुंभ – आपल्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण झाल्याने आपल्या स्वभावात चिडखोरपणा येईल. त्यामुळे इतरांवर राग निघण्याची शक्यता आहे. होणारे काम होणार नाही म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या. विशेषतः जीवनसाथीबरोबर होणारे वाद-विवाद दुर्लक्षित करा. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे तसेच राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. घरातील उपकरणे तसेच वाहने यांच्या देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. पण खर्च आवश्यक असल्याने ते करावेच लागतील.
कार्यपूर्ततेचा आनंद मिळेल
मीन –नवीन कामे हाती घ्याल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नवीन नियोजन करू शकाल. एखादे महत्त्वाचे काम बरेच दिवस होण्याची वाट आपण बघत होता ते काम झाल्यामुळे इच्छापूर्तीचा आनंद घेऊ शकाल. आपल्या प्रयत्नांना यश मिळून अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. काही बाबतीत मात्र अधिक मेहनतीने यश खेचून आणावे लागेल. प्रयत्नात कमी पडून देऊ नका. कुटुंबातून जीवनसाथीची साथ आपल्याला मिळेल. कुटुंबातील मुलींकडून यशदायक वार्ता कानी आल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. नातेवाईक व आप्तेष्ट यांच्यामध्ये वाद-विवाद यांची शक्यता सामोपचाराने वसई-बोरिवली प्रश्न सोडवावे लागतील. नोकरीमध्ये वातावरण चांगले राहून सोपविलेल्या कामामध्ये यश मिळेल. कार्यपूर्ततेचा आनंद मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -