Friday, May 9, 2025

महामुंबईठाणेमहत्वाची बातमी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे राज्य सरकारचं कौतूक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे राज्य सरकारचं कौतूक

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे उद्दगार


नवी मुंबई: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एकाच घरात दोनदा देणं हे राज्यात कुठेही घडलेले नाही. हे राज्य सरकारने केलेलं एक महान कौतुक आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपण हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.


ते पुढे म्हणाले, ‘देशाचे गृहखाते आणि सहकार खाते सांभळताना इतके काम असूनही ते आपल्या सर्वांसाठी येथे आले. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. हा पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिला गेला. कार्य श्रेष्ठ आहे. कार्याचा तो सन्मान आहे. या पुरस्काराचे श्रेय सगळ्यांचे आहे.

Comments
Add Comment