Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार

उपचार सुरु, परिस्थिती गंभीर


नाशिक (प्रतिनिधी) : नवीन नाशिक (सिडको ) दत्त चौक मटण मार्केटच्या मागील बाजूस बाजी प्रभू चौकात अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या तरुण पदाधिकाऱ्यावर आज सकाळी काही अज्ञात गुंडानी गोळीबार केल्याचे वृत्त आहे.


चार चाकी गाडीत आलेल्या चार अज्ञात संशयितांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. दोन फैरी चुकविण्यात हा पदाधिकारी यशस्वी झाला मात्र तिसऱ्या गोळीने अचूक वेध घेतल्याने हा पदाधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्पतरू रुग्णालयात शस्रक्रिया सुरु असल्याचे समजते. दरम्यान राकेश कोष्टी असे या पदाधिकाऱ्याचे नाव असल्याची चर्चा असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि सहा. पोलिस निरीक्षक कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


घटनेचे परिसरातील सीसीटीव्हीत चित्रण झाले असून त्यावरून संशयितांचा पोलिस शोध घेत आहे. पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारी वर्चस्व वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment