जर मी चोर असेन तर मग जगात कोणीच इमानदार नसल्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण प्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर त्यांनी मोदी सरकार विरोधात आकांडतांडव करत जर मी चोर असेन तर मग जगात कोणीच इमानदार नसल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्यावर १४ फोन फोडल्याचा आरोप आहे. मग ईडी सांगते त्यापैकी ४ फोन आमच्याकडे आहेत. तर सीबीआय म्हणते १ फोन आमच्याकडे आहे. मग जर सिसोदियांनी फोन तोडले असेल तर त्यांना कॉल कसे आले, असा सवाल करत या लोकांनी खोटे बोलून दारुचा घोटाळा झाल्याचा आव आणल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल म्हणाले की, सीबीआय, ईडीने मद्यधोरण प्रकरणात न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले, ते मनीष सिसोदिया आणि माझ्याविरोधात साक्ष देण्यासाठी लोकांवर अत्याचार करत आहेत. ईडी, सीबीआयने १०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी ४०० हून अधिक छापे टाकले, पण ही रक्कम सापडली नाही. केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण उत्कृष्ट होते. त्यामुळे भ्रष्टाचार संपला असता.