जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचेही समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले.
बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची ही घटना घडली.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना सांगितले की, खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) होते. ते सर्वजण पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली.
काही जखमी प्रवाशांना दरीतील बसमधून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीला स्थानिक हायकर्स ग्रुप आणि आयआरबी टीम दाखल झाली आहे.
एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे
1) आशिष विजय गुरव, (वय 19), दहिसर मुंबई. 2) यश अनंत सकपाळ, (वय 17) गोरेगाव, मुंबई, 3) जयेश तुकाराम नरळकर (वय 24) कांदिवली, मुंबई, 4) वृषभ रवींद्र कोरमे, (वय 14) गोरेगाव, मुंबई, 5) रुचिका सुनील डुमणे (वय 17), गोरेगाव, मुंबई, 6) आशिष विजय गुरव, (वय १९) दहिसर, मुंबई 7) ओंकार जितेंद्र पवार (वय 25) खोपोली, रायगड 8) संकेत चौधरी (वय 40) गोरेगाव, मुंबई 9) रोशन शेलार (वय 35) मुंबई 10) विशाल अशोक विश्वकर्मा (वय 23) गोरेगाव, मुंबई 11) निखिल संजय पारकर (वय 18) मुंबई 12) युसुफ मुनीर खान (वय 13) मुंबई 13) कोमल बाळकृष्ण चिले (वय 15) सांताक्रुज, मुंबई 14) अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20) गोरेगाव, मुंबई 15) मोहक दिलीप सालप (वय 18) मुंबई 16) दिपक विश्वकर्मा, (वय २०) गोरेगाव 17) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय १८) गोरेगाव
खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे
१) नम्रत रघुनाथ गावनुक, (वय १८) गोरेगाव, २) चंद्रकांत महादेव गुडेकर, (वय 29) गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22) ४) हर्ष अर्जुन फाळके, (वय 19) विरार ५) महेश हिरामण म्हात्रे, (वय २०) गोरेगाव, मुंबई ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (वय 16) गोरेगाव, मुंबई ७) शुभम सुभाष गुडेकर, (वय 22) गोरेगाव 8) ओम मनीष कदम, (वय १८) गोरेगाव, मुंबई. 9) मुसेफ मोईन खान, (वय २१) गोरेगाव, मुंबई
खाजगी रुग्णालय, जाकोटिया रुग्णालयातील जखमींची नावे
१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्षे, रा. खोपोली, रायगड.
खालापूर रुग्णालयातील मयतांची नावे
१) जुई दिपक सावंत, १८ वर्ष, गोरेगाव, मुबई