मुंबई (वृत्तसंस्था) : सपना गिल वाद प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी थॉ अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शॉला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल या दोघांत झालेल्या वादात पृथ्वी शॉच्या तक्रारीने अडचणीत आलेल्या सपना गिलने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावा, अशी मागणी तिने केली होती. या मागणीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून क्रिकेटर पृथ्वी शॉसह फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.