मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ चे (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. हे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर एक मीम सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. या मीमध्ये भाईजान सोबत अभिजित बिचुकले दिसत आहेत.
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये भाईजानचे विस्कटलेले केस दिसत आहेत. तसेच त्याने डोळ्याला गॉगल देखील लावला आहे. तर मीममध्ये सलमान खानच्या शेजारी अभिजित बिचुकलेंचा विस्कटलेल्या केसामधील फोटो दिसत आहेत. फक्त भाईजानने गॉगल लावला आहे. तर बिचुकलेंनी चश्मा लावला आहे. या बिचुकलेंच्या मीमवरदेखील ‘किसी का भाई किसी की जान’ असं लिहिले असल्याचे दिसून येत आहे.
भाईजानने केली बिचुकलेची कॉपी!
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीममध्ये भाईजानने अभिजित बिचुकलेंची कॉपी केल्याच्या विनोदी कमेंट्स येत आहेत. या मीमवर काहींनी बिचूकले भाईजानला बघून बिचकला आहे, तर किसी का अभिजित किसी का बिचुकले अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर, भाईजानने केली बिचुकलेची कॉपी, आम्ही याचा निषेध करत आहोत तसेच साताऱ्याची शान, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री गचकले साहेब अशा कमेंट्सही केल्या आहेत.
View this post on Instagram