Tuesday, July 1, 2025

सख्खे भाऊ पक्के वैरी! कर्नाटकात माजी मुख्यमंत्र्यांची मुले आमने सामने

सख्खे भाऊ पक्के वैरी! कर्नाटकात माजी मुख्यमंत्र्यांची मुले आमने सामने

कर्नाटक (वृत्तसंस्था): कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून एस. बंगारप्पा यांची दोन्ही मुले निवडणूक लढवणार आहेत पण त्यात राजकीय ट्विस्ट म्हणजे हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. हे दोघे भाऊ सोरबा मतदारसंघात आमनेसामने असतील. एस. बंगारप्पा यांचा मोठा मुलग कुमार भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवत आहेत, त्यांचा धाकटा भाऊ मधू काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर भाजपनेही उशीरा का होईना पण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.


या निवडणुकीत अनेक इच्छुकांना नारळ देण्यात आला. त्यामुळे बंडखोरीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मैदानात सोरबा मतदारसंघातील या लढतीची जोरदार चर्चा होत आहे.

Comments
Add Comment