मुंबईतही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ६२२ च्या पुढे गेली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सरकारसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, आज देशात गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १३ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, १० हजार १५८ नवीन रुग्णांची भर पडली होती. यावरून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव किती वेगाने होत आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
COVID-19 | India reports 11,109 new cases in last 24 hours; the active caseload stands at 49,622
(Representative Image) pic.twitter.com/JBAYX6MaXF
— ANI (@ANI) April 14, 2023
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील १० दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असे निष्कर्ष त्यांनी काढले आहेत.
मुंबईतही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत गेल्या चोवीस तासांत २७४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतल्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता १ हजार ६३५ वर पोहोचली आहे.