अहमदनगर : मुंबई पोलिसांना दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने ७ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल केला होता. मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. यासिन सय्यद (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर येथे कारवाई करत यासिन सय्यद याला ताब्यात घेतले आहे. दुबईहून शुक्रवारी सकाळी तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असे यासिने याने मुंबई पोलिसांना फोन करुन सांगितले होते. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असल्याचे सांगितले होते. तसेच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर पोलिसांना दिला होता.
या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. महाराष्ट्र एटीएसने देखील तपास केला होता. व्यक्तिगत वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपीने २०१३ साली हे सिमकार्ड विकत घेतले होते आणि ते कार्ड बंद होऊ नये म्हणून ते फक्त रिचार्ज करत होता. बदला घेण्यासाठी मुंबई पोलिसांना फोन करताना त्याने या सिम कार्डचा वापर केला होता.
यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला अहमदनगरमधून अटक करुन त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सतत असे फेक कॉल केले जात आहेत. पुढे तपासात फोन करणारे व्यक्ती मनोरुग्ण किंवा एखाद्या व्यक्तीशी बदला घेण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…