विजांच्या कडकडाटासह पाऊस, अनेक भागात साचले पाणी
मुंबई : मुंबईत अनेक भागात बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.
मुंबईच्या अनेक भागात बुधवारी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले. वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागले. हा अनपेक्षित पण, सूचित हवामान बदल पाहून शहरातील नागरिकही हैराण झाले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.