स्वामी समर्थ चालिसा

  4053


  • समर्थकृपा : विलास खानोलकर


चाळीस जन्म सोबत समर्थ स्वामी
जे स्वामी चालीसा वाचतील मनोमनी ।।१।।
जे स्वामीसमर्थ रोज स्मरती
नित्य त्यात दत्तगुरू पाहती ।।२।।
साक्षात श्रीदत्तगुरुंची हसरी मूर्ती
करी साऱ्या कामनांची पूर्ती ।। ३।।
दत्तगुरू प्रथम प्रेमळ अवतार
द्वितीय श्रीपादवल्लभ अवतार ।।४।।
तृतीय ते नृसिंह सरस्वती अवतार
चतुर्भूज ते स्वामी समर्थ अवतार ।।५।।
कधी वारुळातूनी घेतला अवतार
कधी वटवृक्षाद्वारे घेतला अवतार ।।६।।
कधी घेतला ओमकारातून अवतार
कधी धरणीतूनच भूवरी अवतार ।।७।।
लोकांवाटे आकाशातूनच घेतला अवतार
कधी कोठे जंगलात घेतला अवतार ।।८।।
कधी शोधू नये नदीचे मूळ
कधी शोधू नये गुरूचे कूळ ।।९।।
हसत हसत बोले औदुंबराचे मूळ
कधी डोले वटवृक्षाचे पारंबी मूळ ।।१०।।
आदित्यासम तेजस्वी चेहरा
चंद्रासम शीतल तू गुरुवरा ।।११।।
करुण वत्सल स्वामी दयाघना
अतिप्रेमळ मूर्ती मनामना ।।१२।।
चित्त बुद्धी स्थिर करिशी ध्याने
भक्तिमार्ग तव डोळस श्रद्धेने।।१३।।
सार्थक झाले शत जन्माचे
ऋण फिटले सात जन्माचे ।।१४।।
कर्म करूनही न उरली आसक्ती
दिनरात करता तुझीच भक्ती ।।१५।।
सुख समाधानात शांतीची शक्ती
तुझ्यामुळेच आली अंगात शक्ती ।।१६।।
तू साऱ्याचा करुणा सागर
शीतल भक्तीने भरली घागर ।।१७।।
हाती धरला नामजपाच्या नांगर
साक्षात झाला सोन्याचाच नांगर ।।१८।।
अजानबाहू तुझे मनोहर रूप
तू स्वामी सर्वांगाने सुस्वरूप ।।१९।।
अज्ञानींसाठी घेतले सामान्यरूप
विद्वानांसाठी घेतले गुरू रूप ।।२०।।
शरण आणण्या शत्रूस घेतले उग्ररूप
जसे अर्जुनास दाविले श्रीकृष्ण विश्वरूप ।।२१।।
भूत पिशाच्चं केले सरळ
अनेकांच्या मनातील झटकले वारूळ ।।२२।।
राजे राजवाडे केले अनेक सरळ
गच्च दातखिळी हाती दिला नारळ ।।२३।।
भक्ता हाती सदिच्छेचे श्रीफळ
भक्त बालकांप्रती प्रेम सुफळ ।।२४।।
गर्व न बाळगता आले जे शरण
चुकविले स्वामीने त्यांचे मरण ।।२५।।
फोडिले अनेक संकटाचे धरण
भुकेलेल्या दिले प्रसाद भात-वरण ।।२६।।
प्रेमळ स्वामीसमर्थ दत्त अवधूत
तेहतीस कोटी देवांचा तू दूत ।।२७।।
गंगेकाठी जशी पापे धूत ।।
स्वामी नजरेने सारी पापे धूत ।।२८।।
छेली खेडेग्रमी तू अवतरला
जगउद्धारासाठी खरा अवतरला ।।२९।।
चोळप्पा, बाळप्पा केले कल्याण
अक्कलकोटाचे झाले महाकल्याण ।।३०।।
तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू
तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ।।३१।।
ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श
त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ।।३२।।
ज्याचा घरात येई संकट
स्वामी नाम घेता पळे संकट ।।३३।।
सोपा सुखकर मार्ग दाविती
सदा गावी स्वामींची कीर्ती ।।३४।।
स्वामी नामात नाही अंधश्रद्धा
नास्तिक हो ठेवा पूर्ण श्रद्धा ।।३५।।
येईल अनुभव याच जन्मी
पारणे फिटेल जन्मोजन्मी ।।३६।।
मनोभावे जे स्वामी पुजती
नाही चिंता नाही भीती ।।३७।।
स्वामी नाम घेता अंधारात उजाला
सिकंदर पौरस सामना जिंकला ।।३८।।
अमर दत्तरूप तू मानव देही
भक्त मागती ती संपदा तू देई ।।३९।।
भक्त विलासाची वाहे सरिता
स्वामी चालिसाचा जप आचरिता ।।४०।।


vilaskhanolkardo@gmail.com

Comments
Add Comment

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Success Tips: पैसा टिकवून ठेवायचा आहे? 'या' ५ चांगल्या सवयी तुम्हाला बनवतील श्रीमंत!

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये केवळ राजकारण आणि समाजकारणच नव्हे, तर पैसा कमावण्याचे आणि

सोनपावलांनी घरा, गौराई येई माहेरा !

मनाचा गाभारा - अर्चना सरोदे आज माझ्या उंबरठ्यात उभी गौर सवाशीण चला लिंबलोण करू, आली माहेरवाशीण ओलांडूनी उंबरठा

गणेशोत्सव श्रद्धा ते सजगता

ऋतुराज - ऋतुजा केळकर गणपती बाप्पा म्हणजे केवळ एक देव नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो सकाळच्या मंद

महर्षी विश्वामित्र

भारतीय ऋषी - डॉ. अनुराधा कुलकर्णी ॐ भूर्भुवःसः । तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात्

शुद्ध भाव

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै देवावर प्रेम करायला शिकले पाहिजे. देवावर प्रेम तेव्हाच करता येईल जेव्हा जेव्हा