Tuesday, July 1, 2025

कवी आले, कवी!...म्हणाले, एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले

कवी आले, कवी!...म्हणाले, एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले या आदित्य ठाकरेंच्या आरोपाला शिंदे समर्थकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही त्यांच्या खुमासदार शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 'एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव


ठाकरे तोंडावर पडले'. अशी चारोळी म्हणत या मुद्द्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
रामदास आठवले म्हणाले की, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले.


आठवले यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, अजित पवार भाजपात जातील असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ, या शब्दांत मुख्यमंत्री पदाचीऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिली आहे.

Comments
Add Comment