Saturday, July 5, 2025

बीबीसीच्या अडचणीत वाढ! ईडीची कारवाई

बीबीसीच्या अडचणीत वाढ! ईडीची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): न्यूज ब्रॉडकास्टर बीबीसी इंडियाच्या अडचणीत वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विदेशी फंडिंगप्रकरणी बीबीसी (British Broadcasting Corporation) इंडियावर फेमा (Foreign Exchange Management Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


ईडीने फेमाच्या तरतुदींनुसार बीबीसीच्या काही अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे आणि स्टेटमेंटचे रेकॉर्डिंगही मागवले आहेत. बीबीसी इंडियाद्वारे केलेल्या परकीय गुंतवणूकीचे (FDI) उल्लंघन झाल्याचा आरोप करत ईडी चौकशी करीत आहे.


प्राप्तिकर विभागाने यंदा बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातही धाड टाकली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, बीबीसी समूहाच्या विविध संस्थांनी दाखवलेले उत्पन्न आणि नफा यांच्यात सुसंगती नाही. बीबीसी इंडियाने कर भरला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते.




Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा