Saturday, June 21, 2025

गिरीश महाजन यांना धक्का! जळगाव मनपात भाजपचे चार नगरसेवक अपात्र

गिरीश महाजन यांना धक्का! जळगाव मनपात भाजपचे चार नगरसेवक अपात्र

जळगाव : जळगाव जिल्हा न्यायालयाने महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असलेले चार नगरसेवक अपात्र ठरवले आहेत. दरम्यान, हा गिरीश महाजनांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.


जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी पाच नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई अशी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल होती. याप्रकरणी जिल्ह्या न्यायालयाने आज १३ एप्रिल रोजी निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्त्यांकडून ॲड. सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले.


याबाबत बोलताना तक्रारदार नगरसेवक प्रशांत नाईक म्हणाले, जळगाव महानगरपालिकेतील पाच नगरसेवकांविरुद्ध जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी दाद मागितली होती. न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे आज न्यायालयाने निकाल दिला आहे. पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती असल्यामुळे इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगत बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. घरकुल घोटाळ्यामध्ये न्यायालयाने नगरसेवकांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली होती त्यामुळे ते नगरसेवक राहण्यास अपात्र होते. आता न्यायालयात अपात्र झाल्याने इतर नगरसेवकांना देखील यातून बोध मिळेल.

Comments
Add Comment