माझ्या प्रवचनांतून बरेचदा हे सांगितले होते की, सत्चित् आनंद हे जे शब्द आहेत, त्या सच्चिदानंद स्वरूपालाच देव असे म्हटलेले आहे. त्याला आपण वेगवेगळी नावे दिली ते वेगळे. मात्र खरा देव कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हाच खरा देव.
या ठिकाणी प्रामुख्याने दिव्य ज्ञान आहे, दिव्य जाणीव आहे व दिव्य शक्ती आहे. खूप काही आहे व ते सगळे दिव्य आहे इतकेच नव्हे, तर त्याच्या संबंधित प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. त्याचे ज्ञान दिव्य, त्याची निर्मिती दिव्य, त्याचा आनंद दिव्य, त्याची शक्ती दिव्य. तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. असे एकही ठिकाण नाही की तो तिथे नाही व तो सर्व ठिकाणी भरलेला हे समजून घेतानाच लोकांची गडबड होते.
लोक विचारतात की, जर तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर तो अनुभवाला का येत नाही? याचे कारण असे एखादी गोष्ट जितकी अधिक सूक्ष्म तितकीच ती आपल्याला सहजासहजी अनुभवाला येण्याची शक्यता कमी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशही पाच तत्त्वे आहेत. या पाच तत्त्वांपैकी पृथ्वीही डोळ्यांना दिसते, स्थूल आहे व परिमित आहे, लिमिटेड आहे. उपयुक्त आहे पण ती लिमिटेड आहे. यापुढे पाणी हे तत्त्व पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आहे. पृथ्वीपेक्षा जास्त उपलब्ध आहे. लक्षात घ्या, पाणी हे तत्त्व पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे. पृथ्वीपेक्षा जास्त उपलब्ध आहे व जास्त उपयुक्त आहे. प्रकाश हे तत्त्व या दोन तत्त्वांपेक्षा सूक्ष्म आहे. तो सर्व ठिकाणी प्राप्त होतो. त्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत. पाणी तरी दुर्मीळ होते, पण प्रकाशाचे तसे नाही. हा पहिल्या दोन तत्त्वांपेक्षा उपयुक्त, अपरिमित व जास्त व्यापक आहे.
याच्या पलीकडे वायू म्हणजे हवा. ही पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्वाची, अत्यंत सूक्ष्म, अधिक उपयुक्त, अधिक उपलब्ध, केव्हाही व कुठेही उपलब्ध. जिथे तुमचे नाक जाईल, तिथे हवा उपलब्ध. सुदैवाने हवेचा काळाबाजार करता आलेला नाही. तो जर करता आला असता, तर काय परिस्थिती झाली असती? प्रकाश आणि हवा यांचा काळाबाजार करता येत नाही, पाण्याचा काळाबाजार होतो. हवा पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म, अत्यंत उपयुक्त, जास्त उपलब्ध ही गोष्ट ध्यानात आली, तर पुढचे जे तत्त्व आहे, ते आकाश. आकाश सर्व ठिकाणी आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे ही आकाशात आहेत. सगळीकडे ते दिसते. आकाश इतके उपयुक्त आहे की, आकाश, वायू आपण असूच शकत नाही. हे सगळीकडे उपलब्ध आहे, हे अत्यंत उपयुक्त आहे व अत्यंत सूक्ष्म आहे.
त्या पलीकडे conscious mind आहे. हे जे conscious mind आहे, त्यालाच चिताका म्हणतात. सगळीकडे जे आहे ते भूताका. हे चिताका पहिल्या सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म, अत्यंत उपयुक्त व सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. त्या पलीकडे cosmic life force आहे. हे सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत अत्यंत अत्यंत सूक्ष्म, अत्यंत अत्यंत अत्यंत उपयुक्त व अत्यंत अत्यंत अत्यंत उपलब्ध आहे. God is life. एके ठिकाणी डॉ. मर्फी म्हणतात, God is life and life principle is flowing through you. Tendency of life हा शब्द बरोबर आहे. God is life and life is God. या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करायचे असते, ते सद्गुंकडून, सद्गुरू कृपेनेच. म्हणूनच,
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…