देशात २४ तासात १०,१५८ नवीन रुग्ण
नवी दिल्ली : देशात एका दिवसात कोरोनाचे १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्ली-महाराष्ट्र सारख्या राज्यात ही वाढ अधिक होत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १० हजार १५८ नवीन रुग्ण आढळले आहेत, ही संख्या गेल्या बुधवारच्या तुलनेत ३० टक्के जास्त आहे.
पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट ४.४२ टक्क्यांवर आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४४,९९८ वर पोहोचली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ४,४२,१०,१२७ च्या वर गेली आहे.
Covid-19 | India reports 10,158 new cases in last 24 hours; the active caseload stands at 44,998
(Representative Image) pic.twitter.com/yS0pdGdjbf
— ANI (@ANI) April 13, 2023
बुधवारी देशात ७,८३० नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदवली गेली. दरम्यान, वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप, सर्दी खोकला असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.