Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीअण्णा हजारेंना धमकी! महाराष्ट्रात खळबळ, धमकी देणारा माणूस आहे....

अण्णा हजारेंना धमकी! महाराष्ट्रात खळबळ, धमकी देणारा माणूस आहे….

श्रीरामपूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना एकाने हत्या करण्याची धमकी दिलीय. मी १ मे रोजी अण्णा हजारे यांना संपवणार असल्याचं एक पत्रच एका शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय.

अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधनी या शेतकऱ्याने हे पत्र पोलिसांना पाठवलं आहे. गायधनी यांचे शेतीचे वाद आहेत. त्यामध्ये हजारे लक्ष घालत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. यामुळे त्याने १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे.

त्याने पत्रात असं म्हटलंय की, मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाच्या कारणातून माझ्या गावातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे.

तसेच शेलार बाई नावाच्या दलित महिलेने माझ्यावर खोटी ट्रॉसिटी (Atrocity) केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे साहेब यांची हत्या करणार असल्याचा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे.

या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली असून याची नोंद घ्यावी, अशी विनंती धमकी देणाऱ्या शेतकऱ्याने केलीय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -