
संजय शिरसाट यांचे विधान
छत्रपती संभाजीनगर : विनायक राऊतची औकात काय? त्याला प्रत्युत्तर फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेच देऊ शकतात. विनायक राऊतला धडा शिकवण्याची धमक माननीय नारायण राणे यांच्याकडेच आहे व ते त्यांना पुरुन उरलेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी विनायक राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.
विनायक राऊत वांरवार शिवसेनेवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीका करत त्यांनी शिवसेनेतील आमदार बंडखोरी करणार आहेत, असा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नाही तर उद्धव गटाचे आमदार बंडखोरी करणार आहेत. तेच आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.
विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेविरोधात असे बोलणे शोभत नाही असा टोला लगावत विनायक राऊत यांना नारायण राणेच धडा शिकवू शकतात, असे संजय शिरसाट म्हणाले.