Sunday, June 22, 2025

अजित पवारांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका!

अजित पवारांकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका!

पुणे : अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हणत पुण्यातील भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


रवींद्र साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गणेशखिंड रस्त्यावर ई-स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे.


गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. सदर प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही या प्लॉटच्या संदर्भात अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरीही तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. याच प्रकरणासंदर्भात साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment